श्रीरामपूर दिपक कदम महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन रेझिंग डे निमित्त श्रीरामपूर येथील डी पॉल पब्लिक सीबीसी स्कूल येथील विद्यार्थ्यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आमंत्रित करून त्यांना पोलीस ठाणे कामकाज तसेच महिला मुली यांचे सुरक्षा संबंधाने कायदे तसेच विद्यार्थिनींना गुड टच बॅट टच इत्यादी बाबत नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभागाचे जयदत्त भवर यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक.पोलिस निरिक्षक गणेश जाधव पो.स.इ श्री मगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राम शिखरे पोलीस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार डी पॉल पब्लिक स्कूल सीबीसी प्रिन्सिपल शिजो. अशोक पवार आशिष अमोलिक रुई शेख मच्छिंद्र वाघमारे नितीन जाधव सुनील पंडित राजेंद्र आवारे नारायण झांबरे प्रियंका शिंदे करुणा पाटील इत्यादी उपस्थित होते.
