भारत मुक्ती मोर्चा नाशिक तर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात आंदोलन मोर्चा;जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Cityline Media
0
मुंबई नाका येथील स्मारकावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी 

नाशिक दिनकर गायकवाड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा नाशिकचे पदाधिकारी आणि जनसामान्य जनतेने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुंबई नाका येथील स्मारकावर अभिवादन केले.
प्रसंगी एच टी फुले,बाबूजी अविनाश पगारे ,शरद साळवे, ॲड रवि एन कांबळे,ॲड सुजाता चौदंते,विलास गांगुर्डे,प्रतिभा लोंढे ,राम ढवळे, व इतर पदाधिकारी हजर होते. त्यामध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अविनाश पगारे व शरद साळवे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे 

आरएसएसच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी निवेदन देण्या संदर्भात तमाम  बहुजन वर्गास आवाहन केले की असंवैधानिक काम करणाऱ्या व मूलनिवासी बहुजन वर्गाचे हक्क व अधिकार नष्ट करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे 

आरएसएसच्या विरोधात निवेदन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे येण्यासाठी २२फेब्रुवारी २०२६ रोजी आरएसएस कार्यालय नागपूर येथे असंवैधानिक काम करणाऱ्या आर एस एस च्या कार्यालयासमोर लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्या संदर्भात तमाम बहुजन वर्गास विनंती करण्यात आली आहे.

सर्व जनतेने मोठ्या संख्येने हजर राहण्यासंदर्भात भारत मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले तसेच सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सर्व तमाम मूळनिवासी बहुजन वर्गास शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!