नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या एनओसी अर्थात,कोणत्याही प्रकारची थकबाकी नसलेले प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात नाशिक महापालिकेच्या तिजोरीत सुमारे १९ लाख २० हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
नाशिक महानगरपालिकेकडून ३२०० एनओसी वितरित करण्यात आल्या होत्या.त्यासाठी प्रत्येकी ६०० रुपयांचे शुल्क घेण्यात आले होते.निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित उमेदवाराकडे कोणत्याही प्रकारची
थकबाकी नसणे गरजेचे असते.त्यासाठी उमेदवारांना महापालिकेचे एनओसी अर्थात,कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. इच्छुक उमेदवारांना असे ३१ प्रकारच्या एनओसी एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी नाशिक महापालिका प्रशासनाने एक खिडकी योजना अर्थात,ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली होती.या पद्धतीमुळे बहुतांश सर्वच इच्छुक उमेदवारांची धावपळ वाचून त्यांना घरबसल्या थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मिळू शकले.महापालिकेकडून इतरही प्रकारचा
महसूल जमा लोकप्रतिनिधी,तसेच मनपाच्या माजी पदाधिकारी, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून अनेक प्रकारची कामे केली जातात.मात्र,ही सेवा करताना बऱ्याचदा महापालिकेच्या संसाधन तसेच सेवेची मदत घेतली जाते.
अशा सेवेची मदत घेताना बऱ्याचदा लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मनपाच्या तिजोरीत शुल्काचा भरणा केला जात नाही. मात्र, निवडणुकीसाठी एनओसी देताना रुग्णवाहिका वापर, अतिरिक्त वाहन वापराचे शुल्क यानिमित्ताने वसूल करण्यात आले आहे.
