संभाजीनगर मधील ख्रिस्ती वधू-वर मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद
संभाजीनगर प्नतिनिधी येथील सेंट थॉमस चर्च,कॅथोलिक सभा,औरंगाबाद व संगमनेरच्या कोंची येथील स्व.दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान, यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच संभाजीनगर येथील सेंट थॉमस चर्च मध्ये आयोजित केलेल्या १६९ व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन औरंगाबाद धर्मप्रांताचे बिशप बर्नाड लँसी पिंटो यांच्या हस्ते झाले.प्रसंगी मार्गदर्शन करताना बिशप म्हणाले कि,वधू-वर मेळाव्याच्या सेवा कार्यातून अनेक विवाह जुळतात आणि यातूनच ख्रिस्ती समाजामध्ये नवीन कुटुंबाची वाढ होत आहे. असे उपक्रम संयोजकांनी चालू ठेवावेत असेही आवाहन बिशपांनी यावेळी केले.
कार्यक्रमात फादर स्टिफन अल्मेडा,फादर संजय रुपेकर, फादर जाधव,फादर पारखे आदीनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी संभाजीनगरसह नाशिक, मनमाड, जालना,अहिल्यानगर,नेवासा,श्रीरामपूर,नांदेड, पैठण इत्यादी ठिकाणाहून आलेल्यांची उपस्थितीत ११६ हुन अधिक होती.
प्रास्ताविक निलेश त्रिभुवन यांनी केले तर पहिल्या सत्रातील सूत्रसंचालन एफ. एम. शिनगारे सर यांनी केले. दुसऱ्या सत्रातील विवाहेच्छूकांच्या परिचयाचे सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले. सुनील त्रिभुन यांनी आभार मानले.
