व्हॉईस ऑफ मीडिया संगमनेर शाखेच्यावतीने सदस्यांसाठी आरोग्यदायी उपक्रम
झरेकाठी सोमनाथ डोळे व्हॉईस ऑफ मीडिया संगमनेर शाखेच्या वतीने सर्व सदस्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आरोग्यदायी उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आला.पत्रकारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या भवितव्याची काळजी घेणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरला आहे.
या उपक्रमाचे आयोजन वरिष्ठ पदाधिकारी व्हाईस ऑफ मिडिया चे प्रदेश कार्यकारिणी संचालक गोरक्षनाथ मदने,राज्य विंग प्रमुख अमोल मतकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली कुलकर्णी,जिल्हा कार्याध्यक्ष गोरख नेहे,जिल्हा सचिव नवनाथ वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू, शहराध्यक्ष महेश पगारे, संगमनेर सचिव सचिन जंत्रे व इतर पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वी झाला.
डॉर्फ केटल सप्रेम संस्था यांच्या सहकार्याने व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या सर्व सदस्यांना भारतीय डाक विभागाच्या १५ लाख रुपयांच्या अपघाती विम्याचे वितरण करण्यात आले.
पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.तसेच एस.बी.आय.लाईक यांच्या वतीने श्री.कांदळकर यांनी उपस्थित सदस्यांना विमा,विमा योजना व गुंतवणूक या विषयांवर सविस्तर आणि मार्गदर्शक माहिती दिली.आर्थिक नियोजन व सुरक्षिततेबाबत सदस्यांना उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
या आरोग्यदायी व हितकारक उपक्रमाबद्दल सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले असून, यापुढे संघटनेतर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ वावरे यांनी केले प्रास्ताविक शहराध्यक्ष महेश पगारे यांनी तर आभार प्रदर्शन गोरख नेहे यांनी केले.
