विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे श्रीक्षेत्र तांभेरे येथे लोकर्पण

Cityline Media
0
-राष्ट्रीय सेवा योजना जनजागृती रॅली
-श्रीराम व मोरेश्वर मंदिर परिसर स्वच्छता,
-स्मशानभूमी व दशक्रिया विधी घाट स्वच्छता,
-नवीन ग्रामसचिवालयासमोर वृक्षारोपण, 
-दलित दफनभूमी व तांभेरे कोल्हार चौक स्वच्छता,
-"धिंगाण्या बैल" श्रद्धांजली उपक्रम,
'-पाणी आडवा पाणी जिरवा' कृतीशील बंधारे बांधण्यात आले 

झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी तालुक्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सात्रळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन श्रीक्षेत्र तांभेरे येथे राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. सर्जेराव मते पाटील यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम जन्मोत्सव समितीचे माजी सचिव चंद्रकांत पवार होते. प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. सर्जेराव मते उपस्थित होते. सरपंच डॉ. उमेश मुसमाडे, सोसायटीचे मा.अध्यक्ष लक्ष्मण गागरे,माजी सचिव काकासाहेब ढगे,साई गणेश शेतकरी मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मुसमाडे उपस्थित होते.

प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना सर्जेराव मते म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्व क्षेत्रात आपले योगदान द्यावे.श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे.

आजच्या तरुणांनी प्रत्येक कामामध्ये वेळेचे नियोजन, अचुकता व सचोटी यांचा अंतर्भाव केल्यास निश्चित यश मिळू शकते. तरुणाई मध्ये समाज परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असून,अशा श्रमसंस्कार शिबीरातून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते.

आईवडिलांच्या अपेक्षापूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत.अपयशाने खचून न जाता ती एक संधी म्हणून त्याकडे पहावे.शिक्षणातूनच विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने सर्वांगिण विकास साधावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन सुप्त गुणांचा परिपूर्ण विकास साधावा.

व्यक्तीमत्त्व विकासातून अपेक्षित असे यश मिळविता येते. यशोगाथेचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाज विकासासाठी करावा. सध्याच्या शिक्षणामधील समस्या व येऊ घातलेले तंत्रज्ञान या विषयी त्यांनी विविध उदाहरणे देवून विद्यार्थ्यांना याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी लक्ष्मणराव आग्रे व दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाचा पुरस्कार प्राप्त ब्लॉगर आदित्य डेरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी लष्कर सुभेदार ताराचंद गागरे, बाळासाहेब बेलकर, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ सात्रळ कॉलेज बलराज पाटील, सुनिल गागरे, पंढरीनाथ शेलार,उत्तम मुसमाडे, बाळासाहेब मुसमाडे, जालिंदर बेलकर, रामदास गागरे, विनोद महाराज मुसमाडे, सोपान शेलार, 

ग्रामस्थ, प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, विज्ञान शाखा समन्वयक प्रो.आर.डी.बोरसे, कला शाखा समन्वयक डॉ. बी.एन.नवले, वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.डी. एन. घाणे ,कार्यालयीन अधीक्षक.महेंद्र तांबे व  ॲड.अनिल गागरे, 

प्रा.संदीप राजभोज (कार्यक्रमाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना) डॉ. सौ. प्रतिभा विखे, डॉ. व्ही.जी.शिंदे, प्रा.डी.डी.आगरकर, प्रा.एस.बी.वाघे,व्ही.एस.दिघे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व शिबिरार्थी तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले.

प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी प्रास्ताविक करुन पाहूण्यांचा परिचय करुन दिला. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून शिबीराचे उदघाटन करण्यात आले.तसेच पाहुण्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, बुके देवून सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन डॉ. दिप्ती आगरकर व डॉ. प्रतिभा विखे यांनी केले.आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. संदिप राजभोज यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!