संगमनेर प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाची नुकतेच जिल्हा कार्यकारणीची बैठक जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी येथे पार पडली.
जिल्हा सचिव दादासाहेब यादव
यावेळी संगमनेर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते दादासाहेब यादव यांची जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली तर आंबेडकरी चळवळतील ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबराव यादव यांची संगमनेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांच्यासह जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने बैठकीसाठी उपस्थित होते.दादासाहेब यादव साहेबराव यादव यांच्या निवडीचे लोकनेते मा. मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आमदार.डॉ.सुधीर तांबे, तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात,सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात,पॅंथर माणिकराव यादव,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी यादव,आदींनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन आणि कौतुक केले. संगमनेर तालुकाध्यक्ष साहेबराव यादव
