मुलींनी स्व संरक्षणासाठी स्वतःशक्तिशाली व्हावे ॲड. सोनाली बोटवे

Cityline Media
0
संगमनेर विशाल वाकचौरे हिंदू मुलींनी स्व-संरक्षणासाठी स्वतः शक्तिशाली होणे गरजेचे आहे. आपल्या मुलींना कराटे तसेच लाठी चालवणे,अशा प्रकारे शिक्षण देणे सुद्धा गरजेचे आहे.आपल्या मुलींना कधीच कमी समजू नका,मुली सुद्धा वंशाचा दिवा आहेत.आपल्या मुलींना आपण खूप शिक्षण द्यावे आणि स्वावलंबी करावे. तसेच लव्ह जिहाद बद्दल सुद्धा आपल्या मुलींना ज्ञान देणे तितकेच गरजेचे आहे,असे प्रतिपादन दुर्गावाहिनी संयोजिका ॲड. सोनाली बोटवे यांनी केले.
संगमनेरातील खंडोबा गल्लीतील खंडोबा मंदिर येथे हळदी-कुंकूचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या.महिलांनी शिक्षणासोबत आध्यात्मिक जोड देणे गरजेचे आहे.आपण आपल्या स्वतःच्या तब्येतीसोबत मनाची काळजी घेणे,सुद्धा गरजेची आहे.

मनाची शुद्धी आणि ध्यान धारणा करणे गरजेचे आहे, असे यावेळी दुर्गावाहिनी जिल्हा सहसंयोजिका शामल बेल्हेकर यांनी सांगितले.महिला संघटित होणे काळाची गरज आहे,असे सकल हिंदू समाजाच्या पूजा अरगडे म्हणाल्या, हळदी कुंकू निमित्ताने सर्व समाजातील महिलांनी जाती-भेद बाजूला ठेवून असे एकत्र आले पाहिजे, संघटन में शक्ती है असे प्रतिपादन रेखा गलांडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे विशाल वाकचौरे,गोपाल राठी, तुषार ठाकूर यांनी प्रयत्न केले. यावेळी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!