मनमाडला रेल्वे वर्धापनदिनी विद्रोही साहित्य संमेलन

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे १२, १३ फेब्रुवारी १९३८ रोजी मागासवर्गीय रेल्वे कामगार परिषद घेतली होती. त्या परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पहिले उत्तर महाराष्ट्र विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन मनमाड येथे १५ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागूल यांनी दिली.
            छाया रेखांकन-प्रकाश कदम 
मनमाड येथे झालेल्या बैठकीस विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्याध्यक्षा प्रा प्रतिमा परदेशी (पुणे), राज्य संघटक किशोर ढमाले (धुळे) यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. डॉ. जे. वाय. इंगळे, ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनचे माजी झोनल 

सचिव सतीश केदारे, राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागूल, राज्य कार्यकारिणी सदस्य अमिन नवाब शेख, नॅशनल रेल्वे मजदूर संघ भुसावळ मंडळाचे खजिनदार अंबादास निकम, सीटूचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामदास पगारे, कवी राजू लहिरे, बामसेफ संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संजय शिरूड, 

बहुजन समाज पार्टी नांदगाव तालुकाध्यक्ष प्रवीण पगारे आदी उपस्थित होते. बैठकीदरम्यान संमेलनाचे स्वरूप, उद्दिष्ट, आयोजनाची रूपरेषा, विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्त्यांचा व्यापक सहभाग कसा वाढवता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विभागात साहित्यिक, विद्रोही कवी, चित्रकार,कलावंत,विचारवंतांनी संमेलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!