लोकमान्य टिळक वाचनालय,आझाद मैदान
श्रीरामपूर दिपक कदम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच विमान दुर्घटनेत बारामती येथे दुर्दैवी निधन झाले असता श्रीरामपूर येथील आझाद मैदानावर लोकमान्य टिळक वाचनालयत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित राहून दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अजित पवार म्हटल्यावर कडक शिस्त नीटनेटकेपणा व कामाचा माणूस असा अनोखा संगम गेल्या ३५ वर्षांपासून अवघ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाला. शहरी व ग्रामीण भागाचा अतोनात अभ्यास असल्याने त्यांच्या कामाची पद्धत निराळी होती. आमच्यासारख्या नवख्या आमदारांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहित केले. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या अजित पवारांनी नेहमीच विकासात्मक कामावर भर दिला.
आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले असून असा नेता परत पाहायला मिळणार नाही याचे मनस्वी दुःख असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
