श्रमसंस्कार शिबिर हे केवळ श्रमाचे नव्हे तर जीवन मूल्यांचे संस्कार घडविणारे प्रभावी माध्यम

Cityline Media
0
डॉ.सुश्मिता विखे पाटील यांचे प्रतिपादन 

-फत्याबादला राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ उत्साहात 

कोल्हार प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन,शिस्त व सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजते.श्रमातून आत्मसन्मान,वेळेचे नियोजन, सहकार्याची भावना आणि कष्टाची सवय लागते. श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन त्यांचा मानसिक, शारीरिक व नैतिक विकास घडतो.त्यामुळे श्रमसंस्कार शिबिर हे केवळ श्रमाचे नव्हे तर जीवनमूल्यांचे संस्कार घडविणारे प्रभावी माध्यम असून भविष्यात जबाबदार नागरिक घडविण्यास ते उपयुक्त ठरते.' असे प्रतिपादन 'लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुश्मिता विखे यांनी केले.
राहाता तालुक्यातील कोल्हार येथील 'लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर' आयोजित करण्यात आले होते. या श्रमसंस्कार शिबीराचा समारोप सुश्मिता विखे यांच्या हस्ते पार पडला यावेळी डॉ. सुश्मिता विखे पा.यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई दुध संकलन केंद्राचे संस्थापक पांडुरंग शिवाजी आठरे होते.

आपल्या प्रमुख भाषणात डॉ. सुश्मिता विखे पा.यांनी विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, पाणी संवर्धन, तसेच सामूहिक श्रमदान अशा विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला याचे कौतुक केले.पांडुरंग शिवाजी आठरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी केले. अहवाल वाचन समन्वयक डॉ. गोरक्ष बोर्डे यांनी केले.आभार डॉ.उत्तम येवले यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.अर्चना लबडे व प्रा. प्रणीता जाधव यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!