नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगर पालिकेच्या पश्चिम विभागाच्या अतिक्रमण विभागाने शरणपूर रोड, कॉलेज रोड ते विसे मळ्यापर्यंत रस्त्यातील अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली. यादरम्यान रस्त्यातील हातगाड्यांसह एक ट्रक साहित्य आडगाव येथील गोदामात जमा करण्यात आले.
मनपा आयुक्त मनिषा खत्री,उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर यांच्या आदेशान्वये मनपा पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शरणपूर रोड ते कॉलेज रोड, विसे मळा परिसरात रस्त्यात असलेल्या हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागूल,संतोष पवार, काळे, दीपक गायकवाड,सुनील कदम, बापू लांडगे, मोहन भांगरे, जगन्नाथ हमारे, संजय सूर्यवंशी, जावेद शेख आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
या कारवाईतील साहित्य आडगाव येथील गोदामात जमा करण्यात आले. एक टपाचा हातगाडा,टेबल स्टॅन्ड,बोर्ड, जाहिराती बोर्ड, प्लास्टिक खुर्चा आदी साहित्य जमा करण्यात आले.
