नाशिक दिनकर गायकवाड लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विंचूर परिसरात एमडी (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाच्या विक्री विरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी धक्कादायक आणि निर्णायक कारवाई केली आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखा (नाशिक ग्रामीण) यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल ७०१ ग्रॅम ५ मिलिग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार याची किमत ४९ लाख १० हजार ५०० रुपये आहे. दुचाकी, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ५० लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या दोन्ही संशयितांना निफाड न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधीश स्नेहा देशपांडे यांच्या
समोर हजर केले असता सुनावणी होऊन सात दिवसांची पोलीस कोठडी न्या. स्नेहा देशपांडे यांनी सुनावली आहे.
या प्रकरणी याकूब खालिद मोमिन (वय ४६, रा. इस्लामपुना, विंचूर, ता. निफाड) आणि संदेश अंबादास फापाळे (वय ३५, रा. मरळगोई) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोघांना न्यायाधीश स्नेहा देशपांडे यांनी दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एमडी ड्रग्स प्रमाणेच गांजा विक्रीही खुलेआम सुरू असून, ॲम्ब्युलन्स औषधे पोहोचविणान्या व्हॅन, तसेच दुचाकी वाहनांच्या माध्यमातून गांजा पोहचविला जात असल्याची चर्चा आहे.विंचूर परिसरातील काही धाग्यांच्या घरांमध्ये गांजा वाळवून त्याचे पॅकिंग करून विक्री केली जात आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पथकाला विंचूर एमआयडीसी परिसरात मेपेॉन या अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाम्यांच्या मार्गदर्शनाखाली विंचूर एमआयडीसी त्रिकुती ते एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच इस्लामपुरा परिसरात सापळा रखण्यात आला. संशयित हालचाली आढळताच दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात एमडीज आढळून आले.
या कारवाई दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार विंचूर बसस्थानक परिसरातही संशयास्पद हालपाती आढळल्यामुळे तपासणी करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीत आरोपींनी एमडीची साखळी व पुरवठ्याबाबत महत्वाची माहिती दिल्याचे समजते. त्याआधारे काही ठिकाणी तपासणी करण्यात आली असून,पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी एनडीपीएस करयदा १९८५ अंतर्गत कलम ८ (क) व २९ प्रमाणे लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, एमडीच्या पुरवठा साखळीचा छडा लावण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. अमली पदाथांविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी उचललेले हे पाऊल परिसरात खळबळ उडवणारे ठरले असून,अशा अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील,असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
