नाशिक दिनकर गायकवाड लहान मुलास शाळेत सोडण्यास जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
सविस्तर याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी महिला ही तिच्या लहान मुलास शाळेत सोडविण्यासाठी पायी जात होती.त्यावेळी आरोपी प्रसाद काळे (रा.हरिहर कॉलनी, काठे गल्ली, नाशिक) याने मोटारसायकलीने पीडित महिलेचा घरापासून काशीमाळी मंगल कार्यालय,
द्वारकापर्यंत पाठलाग करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात प्रसाद काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार टेहरे करीत आहेत.
