खडकेवाके ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दिपक तान्हाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड

Cityline Media
0
राहता प्रतिनिधी तालुक्यातील आदर्श गाव खडकेवाके ग्रामपंचायतीवर नामदार राधाकृष्ण विखे पा.आणि मा. खासदार डॉ. सुजय विखे पा.यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाची एक हाती सत्ता आहे गत उपसरपंच अश्विनी रवींद्र सुरासे यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांनी नुकताच राजीनामा दिला.त्यामुळे ग्रामपंचायतचे उपसरपंच पद रिक्त झाले होते त्या जागी डॉ.सुजय  विखे पा.यांचे कट्टर समर्थक व ग्रामपंचायत सदस्य दिपक तान्हाजी गायकवाड यांची नुकतीच बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी सभेचे अध्यक्ष खडकेवाके ग्रामपंचायतीच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच यांनी अधिकृत घोषणा केली प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी श्री.भालेराव यांनी काम पाहिले यावेळी जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसंगी सरपंच संगीता मुरादे जनसेवा मंडळाचे अध्यक्ष जालिंदर मुरादे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गायकवाड बी.टी मुरादे मा‌. उपसरपंच सचिन सुरासे  शिवाजी मुरादे नरेंद्र मुरादे विलास मुरादे कैलास मुरादे राजेंद्र सुरासे सोमनाथ मुजमुले रमेश जाधव अनिता जाधव आदींची भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम लोकनियुक्त सरपंच सचिन मुरादे यांनी केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मुरादे  बाळासाहेब लावरे अश्विनी सुरासे हिराबाई मुरादे मनीषा लावरे कविता लावरे  सुभाष यादव गोरक्षनाथ लावरे रंगनाथ सुरासे सुदाम लावरे 

रावसाहेब गायकवाड सचिन गायकवाड यशवंत गायकवाड सुभाष गायकवाड संदीप गायकवाड बंटी गायकवाड प्रवीण गायकवाड गजानन गायकवाड भारत गायकवाड सखाराम गायकवाड भीमराज गायकवाड रवींद्र गायकवाड महेश गायकवाड शिवाजी गायकवाड राजेंद्र मुरादे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अंतिमतः उपसरपंच दिपक गायकवाड यांनी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!