निवडणुकीआधीच महायुतीचे २२ उमेदवार बिनविरोध झाल्याने ‌ महायुतीचे पारडे जड

Cityline Media
0
चमक्या आणि ब्लॅकमेलचा आधार असल्याची चर्चा

मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क निवडणुकीआधीच राज्यातील ८ महापालिकांत महायुतीचे एकूण २२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपने विजयाचा शंखनाद फुंकला होता. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात येथे भाजपच्या ५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे ४ उमेदवार बिनविरोध आले आहेत. त्यामुळे, केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना युतीने ९ उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली आहे. महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

राज्यात बिनविरोध निवडून आणण्याचे काम सुरु आहे. धमक्या आणि ब्लॅकमेल करून बिनविरोध निवडून आणले जात आहे.भाजपा आणि शिंदे गटात चढाओढ सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी पालकमंत्र्याचा दबाव आणाला जात आहे. याला तुम्ही लोकशाही म्हणता?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. जळगावला उमेदवारांचे अपहरण च करण्यात आले. धमक्या देऊन अर्ज ये मागे घ्यायला लावले. आम्हालाही धमक्या सगळीकडून आल्या, पण आम्ही धमक्यांना भीक घालत नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीआधीच प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेना शिंदे गटाचे स्थान अधिक भक्कम केलेल आहे. या प्रभागात शिवसेना ठाकरे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पार्टीचाही एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!