नाल बसविण्यासाठी घोड्याशी क्रुरतेने वागणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड घोड्याच्या पायाची नाल पकडीच्या सहाय्याने काढून घोड्याला दुखापत करणाऱ्या परप्रांतीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी लक्ष्मी पांडुरंग जाधव (रा. शुभम् पार्क, सिडको, नाशिक) या झेप्टो कंपनीचे पार्सल देण्यासाठी सह्याद्रीनगर येथे गेल्या होत्या.त्यावेळी आरोपी नदिम आजाद अली (रा. दूध बाजार, जुने नाशिक, मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याकडे फिर्यादीने घोड्याच्या नालीबाबत विचारले असता त्यांनी एक नग ७५० रुपये असल्याचे सांगितले.

त्यावेळी फिर्यादीने नालीचे चार नग द्या,असे सांगितले. आरोपींनी त्यासाठी घोड्याच्या पायाला लावलेली नाल पकडीच्या सहाय्याने काढून घोड्याच्या पायाला दुखापत केल्याची बाब लक्षात आली.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मुक्या प्राण्याशी क्रूरतेने वागल्याप्रकरणी आरोपी नदिम अली व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ठुबे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!