मिरजगाव व खर्डा पोलिस ठाणे हद्दीत वाळू उपसा व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

Cityline Media
0


स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;चार आरोपीकडून ८२,४०,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत नुकतेच आदेशित केले होते.
या आदेशान्वये पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, बिरप्पा करमल,श्यामसुंदर जाधव,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर यांचे पथक तयार करुन अवैध वाळु उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले होते.

हे पथक नुकतेच मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळु उत्खनन/उपसा बाबत माहिती घेत असताना. पथकास गुप्त खबऱ्या मार्फत नागापुर गावचे शिवारात नदीपात्रात जेसीबी व ट्रॅक्टर ट्रॉलीचे साह्याने चोरुन वाळु काढत असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पथकाने या ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी दोन जेसीबीचे साह्याने तीन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गौण खनिज भरत असतांना दिसुन आले.तेव्हा पथकाने या ठिकाणी छापा टाकणे कामी जात असतांना तेथुन काही इसम पळुन गेले.

तेथे असलेल्या इसमांना पोलीसांची ओळख सांगुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गावा विचारले असता त्यांनी त्यांचे नांव १) संदिप अशोक जाधव वय- २७ वर्षे रा.खडकत, ता. आष्टी, जि.बीड, २) नितीन केरबा कापरे वय- ३१ वर्षे रा. नागलवाडी ता.कर्जत, जि. अहिल्यानगर, ३) अलम निजामुद्दीन शेख वय- ३० वर्षे रा. बडाअरा बुजुर्ग, ता.तमकोहीराज, जि. देवरीया उत्तर प्रदेश हल्ली रा. नागलवाडी, ता.कर्जत असे असल्याचे सांगितले.

ताब्यातील इसमांकडे दोन ट्रॅक्टरवरील पळुन गेलेल्या चालकांचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्यांचे नांव ४) अजय खेडर (पुर्ण नांव माहिती नाही),(फरार) ५) ऋषिकेश खेडकर (पुर्ण नांव माहित नाही) (फरार) दोघे रा. सांगवी ता.आष्टी, जि.बीड,असे असल्याचे सांगितले.

त्याचेकडे वाळु वाहतुकीचे परवान्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचेकडे कोणताही वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याचे कळविले. ताब्यातील इसम नामे संदिप अशोक जाधव हा चालवित असलेल्या जेसीबीचे मालकाबाबत विचारपुस करता त्यांनी सांगितले.

 जेसीबीचे मालक ६) संभाजी बाबुराव बांदल रा.नागलवाडी ता. कर्जत(फरार) असल्याचे सांगितले तसेच व अलम निजामुद्दीन शेख याचे ताब्यात मिळुन आलेल्या जेसीबीचे मालाबाबत विचारपुस करत त्याने सांगितले की, जेसीबा मालक ७) धनंजय बांदल (पुर्ण नांव माहित नाही) रा.नागलवाडी ता.कर्जत जि. अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगितले आहे.

ताब्यातील इसमाचे कब्जातुन ५०,००,००० रुपये किमतीचे दोन जेसीबी, २४०००,००० किमंतीचे तीन वेगवेगळ्या कंनपीचे ट्रॅक्टर ट्रॉली, ३०,०००-रु कि.ची ३ ब्रास वाळु असा एकुण ८४,३०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपीविरुध्द पोकॉ भाऊसाहेब राजु काळे नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन मिरजगाव पोलीस ठाणे गु.र.नं. १८/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२),सह पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास मिरजगाव पोलीस ठाणे करीत आहे.तसेच वरील पथकाने खर्डा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळु उत्खनन/उपसा बाबत माहिती काढत असताना.नुकतेच  पहाटेच्या सुमारास या पथकास खबऱ्या मार्फत खर्डा शहर परिसरात खर्डा ते भुम रोडवर गौण खनिज वाळुने भरलेला ट्रॅक्टर येणार असल्याची असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पथकाने खर्डा बस स्टॅन्ड समोर जावुन सापळा रचुन थांबले असता एक ट्रॅक्टर येतांना दिसुन आले. तेव्हा पथकाने सदर ट्रॅक्टर थांबवुन चालकास पोलीसांची ओळख सांगुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे १) योगेश अण्णा सुरवासे वय- २८ वर्षे रा. खर्डा ता.जामखेड असे असल्याचे सांगितले आहे.

ताब्यातील इसमाचे कब्जातुन ८,००,००० रुपये किमतीचा एक ट्रॅक्टर ट्रॉली, १०,०००रु किमंतीची १ ब्रास वाळु असा एकुण ८,१०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपी विरुध्द पोना श्यामसुंदर अंकुश जाधव नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन खर्डा पोलीस ठाणे गु.र.नं. ०९/२०२६ भारतीय न्याय संहिता२०२३  चे कलम ३०३(२), सह पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास खर्डा पोलीस ठाणे करीत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने मिरजगाव व खर्डा पोलीस ठाणे हद्दीमध्ये या कारवाया करुन एकुण ८२,४०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला असुन यापुढेही सतत अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!