श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध विषयाबाबत आढावा बैठक अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली या बैठकीला आमदार हेमंत ओगले उपस्थित राहून मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्यासोबत चर्चा केली.यावेळी बैठकीत अनेक मुद्दे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
प्रसंगी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहा बाबत चर्चा श्रीरामपूर शहरातील गोंडवस्ती पुनर्वसन श्रीरामपूर तालुक्यातील तृतीयपंथींना घरकुल व स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे.महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ श्रीरामपूर यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देणे.
श्रीरामपूर तालुका क्रीडा संकुल जागा मागणी.श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जागा उपलब्ध करून देणे. न्यायिक अधिकारी,श्रीरामपूर यांच्या निवास स्थानासाठी जागा उपलब्ध करून देणे.खंडकरी शेतकरी यांचे जमीन अदलाबदल वाटप क्षेत्र, शिल्लक क्षेत्र, प्रलंबित मागणी क्षेत्र यातील मागण्यांबाबत
जिल्हा नियोजन समिती निधी वाटपातील असमानता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या श्रीरामपूर येथील जागेवर केलेले अतिक्रमण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणी बाबत सखोल चर्चा करून मुद्दे स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यावर तात्काळ योग्य कार्यवाही करावी अशी मागणी केली.
यावेळी आमदार हेमंत ओगले श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष करण ससाणे, अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन गुजर, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे,श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माऊली मुरकुटे आदींसह प्रांताधिकारी किरण सावंत, पोलीस उपअधीक्षक भवर व विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
