हनुमंतगाव संदीप गावडे राहुरी तालुक्यातील सात्रळ परिसरातील ओम साई क्लासेस मधील इयत्त्ता ७ वी मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी कु. आराध्या गणेश अंत्रे हिने १००पैकी ९४ गुण मिळवून जवाहार नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी प्रवेश मिळविला आहे.
आराध्या अंत्रे हिचे पुढील शिक्षण फ्रीशिप मध्ये होणार आहे. तिच्या या यशामध्ये ओम साई क्लासेसचा मोलाचा वाटा आहे. तिच्या या यशासाठी ओम साई क्लासेसचे संचालक प्राध्यापक महेश अनाप प्राध्यापिका सोनाली अनाप ,प्राध्यापिका सुवर्णा वारुळे ,प्राध्यापिका आरती ताजणे ,
प्राध्यापिका समृद्धी दिघे ,प्राध्यापक विनायक लाळे, प्राध्यापक बाबासाहेब पारखे या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. लवकरच १२ वी बोर्ड परिक्षा सुरु होत आहे.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन केले बोर्ड परिक्षा झाल्यानंतर लगेचच एम एच टी-सीईटी क्रॅश कोर्स बॅच सुरु होईल असे कळविण्यात आले आहे.
