संभाजीनगर प्नतिनिधी सेंट थॉमस चर्च,कॅथोलिक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने व स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान यांच्या तर्फे शनिवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सेंट थॉमस चर्च, सेव्हन हिल्स,जालना रोड, संभाजीनगर येथे १६९ व्या राज्यस्तरीय ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन बिशप बर्नाड लँसी पिंटो यांच्या हस्ते होणार असून फादर स्टिफन अल्मेडा व फादर व्हलेरियन फर्नांडिस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यास राज्यातील उपवर ख्रिस्ती युवक युवतींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आलेल्या सुवर्णं संधीचा फायदा घ्यावा असे अवाहन स्थानिक धर्मगुरू फादर संजय रुपेकर,एफ. एम. शिनगारे,निलेश त्रिभुवन व पुणे येथील संयोजक श्रीधर भोसले यांनी केले आहे.
