ते आज पर्यंत अस्तित्वात होते परंतु पुन्हा एकदा फडणवीस सरकारच्या मनामध्ये जातीय द्वेष उफाळून आला आणि मुस्लिम समाजाचे आरक्षण हे मुळापासून उपटून टाकण्याचं काम या शासनाने केलेला आहे परंतु मुस्लिम समाजाच्या नावावर मत मागणारे या सत्तेमध्ये जे सहभागी आहेत.
आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अजित पवार गटाचे मुस्लिम पदाधिकारी मुस्लिम नेते व मुस्लिम मंत्री यांनी या प्रकारच्या फडणवीस शासनाच्या मुस्लिम विरोधी क्रूरनिर्णयाचा कोणत्याही प्रकारचा विरोध करण्याचे धाडस दाखविले नाही.
त्यांच्यामध्ये थोडा जरी स्वाभिमान जिवंत असेल तर त्यांनी ताबडतोबिने आपल्या पक्षप्रमुखांकडे मुस्लिम समाजाचे आरक्षणाचा विषय हिरीरीने मांडला पाहिजे व त्यांच्या प्रमुख नेत्यांनी निर्णय न घेतल्यास अशा पक्षांमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम नेत्यांनी व मुस्लिम कार्यकर्त्यांनी व मंत्र्यांनी ताबडतोब सदर पक्षांपासून फारकत घेणे याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
कारण या महाराष्ट्रामध्ये किंवा देशांमध्ये मुस्लिम देश करून फक्त आपल्या राजकारणाची पोळी भाजण्याचं काम हे फक्त भारतीय जनता पक्ष करत आहेत व स्वतःला धर्मनिरपेक्ष वादी बनणारे एनडीएतील पक्ष त्यांना पाठिंबा देत आहे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे असे मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजित पठाण यांनी म्हटले आहे.
नुकतेच मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अजित पठाण यांचे अध्यक्षतेखाली चौक मंडई कारंजा नाशिक येथे अध्यादेश रद्द केल्याचा निषेध करण्यात आला यावे मुख्तार शेख बबलू शेख फरीद शेख मुजाहिद फारुकी फारुक शेख नादीर पठाण आधी कार्यकर्ते उपस्थित होते
