नाशिक जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांचे मोफत बुट पॉलिश

Cityline Media
0
चरण सेवा फाउंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम वाखण्याजोगा

नाशिक दिनकर गायकवाड येथील रणनिती बहुउद्देशीय संस्था संचलित चरण सेवा फाऊंडेशन सेवाभावी संस्थेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा सरकारी कार्यालये येथे समर्पित भावनेने मोफत बूट पॉलिश करणाऱ्या उपक्रमास प्रथम प्राधान्य देऊन आपल्या सेवाभावी कृतीला प्रारंभ केला आहे.
                   संतोष जव्हारलालं रखमे 
या संस्थेने नुकतेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे विनामुल्य बुट पॉलिश करण्याची परवानगी मागितली आहे.

चरण सेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की रणनिती बहुउद्देशीय संस्था, नाशिक संचलित 'चरण सेवा फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेमार्फत नाशिक जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भाग्ततील शासकीय कार्यालये,प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये चरण सेवा (विनामूल्य बूट पॉलिश) हा उपक्रम राबविण्याबाबत मानस व्यक्त केला आहे.

चरण सेवा फाउंडेशन संस्थेचा मुख्य उद्देश मानवी सेवा असून,अस्वचा पादत्राणांमुळे होणाऱ्या त्वचा संसर्गास आळा घालणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा आहे. या उपक्रमांतर्गत संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक विनामूल्य सेवा देणार आहेत.

त्यानुसार, आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांमध्ये (प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय इ.) सदर संस्थेचे स्वयंसेवक उपक्रम राबवण्यासाठी आल्यास, त्यांच्या कामाचे स्वरूप पाहून आणि शासकीय कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घेऊन, त्यांना नियमानुसार आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य करावे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!