नाशिक दिनकर गायकवाड तक्रार केल्याचा राग मनात
धरून महिलेचा विनयभंग करीत कुटुंबातील सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी या घराकडे पायी जात असताना त्यांचा पाठलाग करून आरोपी दीपक शंकर शेट्टी (रा. पांडवनगरी, नाशिक) याने फिर्यादीची आई व बहीण घरात असताना "तू माझ्याविरुद्ध तक्रार का केली? मी तुम्हाला सोडणार नाही," असे म्हणून शिवीगाळ केली.
घरातील टीव्हीची तोडफोड करून नुकसान केले व घरातील सदस्यांना मारीन,अशी धमकी दिली. त्यानंतर स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात शेट्टीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
