राहुरी फॅक्टरी येथे शिधापत्रिका कॅम्पचे आयोजन

Cityline Media
0
-दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ.
-आप्पासाहेब ढूस जनसंपर्क कार्यालयाचे वतीने रेशन कार्ड कॅम्पचे आयोजन
- तीन एकल महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा.. तर, दोनशे पेक्षा जास्त नागरिकांना विविध योजनेचे लाभ.!
 
राहुरी फॅक्टरी प्नतिनिधी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे जन्मलेले महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ नुकतेच प्रसादनगरसह राहुरी फॅक्टरी येथील सर्व नागरिकांसाठी येथील ताहाराबाद रोडवर कऱ्हाड कॉर्नर येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस जनसंपर्क कार्यालयाचे वतीने राहुरी येथील तहसील कार्यालयाचे सहकार्याने रेशन कार्ड धारकांचे विविध प्रश्न मोफत सोडविण्यासाठी नुकतेच सकाळी ११ ते दुपारी ०४ वाजेपर्यंत कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना,तसेच नवीन व विभक्त शिधापत्रिका, दुबार शिधा पत्रिका,रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, किंवा. नाव कमी करणे आदी गोष्टींसाठी नागरिकांना रोजंदारी बुडवून थेट राहुरी येथील तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत असे. नागरिकांच्या मागणी नुसार आप्पासाहेब भिमराज ढूस जनसंपर्क कार्यालयाचे वतीने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
 
या कॅम्पमध्ये तीन एकल (विधवा) भगिनींनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली. तसेच,जवळपास तीस कुटुंबांनी त्यांचे कूपनातील नाव कमी करणे,किंवा,नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली असून. त्या व्यतिरीक्त देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील मोठ्या संख्येने नागरिकांनी कॅम्पला उपस्थिती लावून रहिवाशी तसेच उत्पन्न दाखले चा लाभ घेऊन आपली विविध विभागाची कामे मार्गी लावली.

राहुरी तहसील कार्यालयाचे वतीने या कॅम्पसाठी कामगार तलाठी, सेतू केंद्र चालक, संजय गांधी निराधार योजना विभाग, पुरवठा विभाग आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याबद्दल आप्पासाहेब ढूस यांनी राहुरीचे तहसीलदार व त्यांच्या सर्व पथकाचे आभार मानले.

या कॅम्पच्या यशस्वितेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा संपर्क प्रमुख गणेश भालके, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख चंद्रकांत कराळे, देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, राहुरी फॅक्टरी महिला शहर प्रमुख रजनी कांबळे, उप प्रमुख वंदना कांबळे, तैनूर पठाण, किशोर परदेशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!