आमची सगळी गंगा उलटी आहे.

Cityline Media
0
आम्हाला रामायण महाभारतात किती सैन्य लढले याची माहिती आहे,आम्हाला मोहम्मद गझनीच्या सैन्याची आकडेवारी माहिती आहे, आम्हाला गझनीने मारलेल्या माणसांची आकडेवारी माहिती आहे.             छाया रेखांकन ईश्वरी भागवत 
आम्हाला मुघलांच्या सैन्याची आकडेवारी माहिती आहे. 
आम्हाला पानिपतावर झालेल्या युद्धाची आकडेवारी माहिती आहे,आम्हाला जेएनयु मध्ये किती निरोध वापरले जातात हेही माहिती आहे,आम्हाला राहुल गांधी किती वेळा परदेशात जातात हेही माहिती आहे. 

आम्हाला सगळ सगळ सगळ माहिती आहे,पण आम्हाला नोटाबंदीच्या काळात रांगेत उभारून किती माणस मेलीत ते माहिती नाही. 
आम्हाला कोरोनात किती माणस प्राणवायू मिळाला नाही म्हणून मेली ते माहिती नाही. 

आम्हाला लॉकडाऊन मध्ये पायपीट करत मुलुखात गेलेली किती माणस मेली ते माहिती नाही. 

आम्हाला पीएम केअर्स फंडाची नेमकी स्थिती आणि कायदेशीर मान्यता माहिती नाही.

आम्हाला शेतकरी आंदोलनात दिल्लीच्या सीमेवर किती शेतकरी शहीद झाले हे माहिती नाही. 

आम्हाला कुंभाच्या चेंगराचेंगरीमध्ये किती माणस मोक्षाला गेली हे माहिती नाही. 

आधुनिक काळात लोकांची माहिती आणि स्मरणशक्ती तल्लख होते,आमची सगळी गंगा उलटी आहे.

आनंद शितोळे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!