श्रीरामपूर दिपक कदम माझे शहर स्वच्छ शहर अभियान अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूण्यतिथी निमित्ताने हुतात्मा दिन व राष्ट्रीय स्वच्छता दिना निमित्त नुकतेच श्रीरामपूर येथील मदर तेरेसा चौकामध्ये महाराष्ट्र ख्रिस्ती अल्पसंख्याक विकास परिषदेच्या वतीने स्वच्छता दिन साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय स्वच्छता दिनी प्रथम हुतात्मा दिन म्हणून .
महात्मा गांधींनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार करु, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करू या उक्तीप्रमाणे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी महाराष्ट्र ख्रिस्ती अल्पसंख्याक विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिपक कदम,सुरेश ठुबे,अपंग सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे, जेम्स पंडीत, राजीव साळवे, निशिकांत पंडीत, मॅन्युअल घागरे,अनिल चांदेकर, भाऊसाहेब तोरणे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
