परिवर्तन कामगार सेना जिल्हाध्यक्षपदी ॲड बोधिवती देहाडे

Cityline Media
0
सौ.शुभागी जगताप युवक आघाडीच्या संघटकपदी 

नाशिक दिनकर गायकवाड नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी,युवकांसाठी वेळोवेळी आंदोलन करणाऱ्या ,जिल्ह्यातील इगतपुरी येथील विद्यार्थी नेत्या,नाशिक जिल्हा सह राज्यात हजारो युवक ,युवतींच संघटन करून त्यांच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी लढा देणाऱ्या ॲड. बोधिवती तथा निशा देहाडे यांची परिवर्तन  कामगार सेना - आघाडीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यातील शोषित महिला भगिनी व युवतींवरती होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात सातत्याने लढा देणाऱ्या सौ .शुभांगी जगताप यांची परिवर्तन कामगार सेना युवक आघाडीच्या नाशिक जिल्हा संघटकपदी नियुक्त करण्यात आली आहे.
                जिल्हाध्यक्ष ॲड.बोधिवती देहाडे
या दोन्ही नियुक्त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदर्गे यांच्या हस्ते केंद्रीय कार्यालयात करण्यात आलेल्या असून प्रसंगी उपस्थित परिवर्तन कामगार सेनेच्या नाशिक शहराध्यक्ष सुनंदा विसपुते जळगाव युवक जिल्हाध्यक्ष संदीप नफ्ते,नाशिक शहराचे प्रतिष्ठित पत्रकार दिनेश गायकवाड, उपस्थित होते.
परिवर्तन कामगार सेना- युवक आघाडी, नाशिक जिल्हा युनिट सर्व पदाधिकाऱ्यांनी  या निवडी बद्दल समाधान व्यक्त केले असून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
                  संघटक सौ.शुभांगी जगताप
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!