म्हैसगांव कमलेश विधाटे रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा तथा इंदू मिलचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशान्वये आगामी होऊ घातलेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ ही केवळ सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या मूलभूत हक्कासाठी लढायची या अनुषंगाने नुकतेच राहुरी शहरातील गाडगे बाबा आश्रम या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजु आढाव व रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित केली होती.
बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्याचे सर्वांनुमते ठरवण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख राजुभाऊ आढाव आपल्या भाषणात म्हणाले की रिपब्लिकन सेनेची युती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना
पक्षा बरोबर झालेली असताना नगर जिल्ह्यामध्ये मित्रपक्षाने नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता निवडणुका लढवल्या यामुळे शिंदे गटाला मताची बेरीज वाढवता आली नाही ,आगामी निवडणुकांमध्ये
शिवसेना पक्षाने (शिंदे गट) रिपब्लिकन सेनेला विश्वासात घेतले नाही तर रिपब्लिकन सेना स्वबळावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे सांगितले ,राहुरी तालुक्यातील प्रत्येक गट आणि गणात कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करण्याचे आदेश ही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे चंद्रकांत जाधव यांनी तालुक्यातील फुले शाहू आंबेडकरी विचार धारेवर काम करणारे कार्यकर्ते व संविधान प्रेमी लोकांना आव्हान केले की गटागणामध्ये होणाऱ्या घोंगडी बैठकीला आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे तसेच इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी करावी आणि याच अनुषंगाने नुकतीच दिनांक राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील बुद्ध विहारातून घोंगडी बैठकीला सुरुवात झाली, सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन जिल्हाप्रमुख राजू आढाव व युवा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते तर जिल्हा उपाध्यक्ष भरजी भांबळ, युवा जिल्हा महासचिव अमोल मकासरे राहुरी तालुका कार्याध्यक्ष नंदू साळवे ,युवा तालुका कार्याध्यक्ष संदीप साळवे यांच्या हस्ते मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करून सामुदायिक वंदना घेण्यात आली यावेळी अमोल मकासरे भरतजी भांबळ, नंदू साळवे , चांगदेव भिसे ,पत्रकार कमलेश विधाटे यांची भाषणे झाली यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेना पक्षात प्रवेश केला.
या बैठकीसाठी युवा जिल्हा सचिव राजेंद्र विधाटे, युवा तालुका उपाध्यक्ष नानासाहेब विधाटे युवा तालुका सचिव सचिन विधाटे यांनी आयोजन केले होते या बैठकीसाठी विनायक विधाटे ,हरीश विधाटे ,दिलीप लाहुंडे ,विकास छत्रे ,आकाश विधाटे ,अजय विधाटे ,रोहित विधाटे ,रोहित साळवे ,प्रवीण विधाटे ,लक्ष्मण गुलदगड ,प्रवीण विधाटे ,भाऊसाहेब विधाटे ,अनिकेत विधाटे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते
यावेळी सूत्रसंचालन कमलेश विधाटे यांनी तर आभार प्रदर्शन नानासाहेब विधाटे यांनी केले.
