पत्रकारांचा सन्मान करणे अभिमानास्पद-ज्ञानेश्वर आहिरे

Cityline Media
0
पत्रकारांचा सन्मान करणे अभिमानास्पद -ज्ञानेश्वर अहिरे

हनुमंतगाव संदीप गावडे केवळ ग्रंथ पुरवून वाचकांची वाचनाची भूक न भागविता समाजप्रबोधन,सत्यनिष्ठ पत्रकारिता व लोकशाही मूल्याचे रक्षण करणाऱ्या पत्रकार बांधवांचा गौरव ज्ञानदीप वाचनालय व एकलव्य भिल्ल सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांच्या पुढाकारातून हनुमंतगावात पत्रकार दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.वातावरणात स्नेह,आदर आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली होती.अध्यक्षस्थानी ॲड. किसनराव शंकरराव कोतकर हे विराजमान होते.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार तसेच स्थानिक ग्रामस्थ दिवंगत सोपान पर्वत, दिवंगत अशोक घोलप,दिवंगत गडधे महाराज, दिवंगत नानासाहेब ब्राम्हणे व भागीरथीबाई ब्राम्हणे या दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बोलताना ज्ञानेश्वर अहिरे म्हणाले, “पत्रकार हे समाजाचे सजग प्रहरी आहेत. गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि जगात घडणाऱ्या घटना कोणताही संकोच न बाळगता समाजासमोर मांडण्याचे धाडस पत्रकार करतात. सत्य मांडण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे म्हणजे समाजाच्या कृतज्ञतेचा प्रत्यय होय.” त्यांच्या या विचारांना उपस्थितांकडून दाद मिळाली.

पत्रकार आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ व्हावे, पत्रकारितेतील सत्यनिष्ठा, निडरपणा आणि समाजा भिमुखता यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच यावेळी संचालक अशोक घोलप,संजय अनाप यांनी पत्रकार दिनाच्या निमित्ताने हनुमंतगावात पार पडलेला हा सोहळा पत्रकारितेच्या कार्याला सलाम करणारा आणि समाज–पत्रकार यांच्यातील नात्याला अधिक दृढ करणारा ठरला असल्याचे सांगितले.

गावातील सामाजिक सलोखा, कृतज्ञता आणि जागरूकतेचा प्रत्यय देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील.गावपातळीवर पत्रकारांचा सन्मान करण्याची परंपरा सुरू करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे यावेळी अनेकांनी नमूद केले.

कार्यक्रमास हनुमंतगाव येथील कारखान्याचे संचालक अशोक पा. घोलप,संजय अनाप ॲड.विलास ब्राम्हणे,वंसत घोलप,प्रदेशाध्यक्ष शिवाजी गांगुर्डे,अनिल घोलप,बाळासाहेब दिघे,उत्तम जेजुरकर,बाबासाहेब अंत्रे,भानुदास पर्वत,कोल्हार मंडल सदस्य दिपक घोलप,

नामदेव अनाप, अण्णासाहेब गावडे, भागवत अनाप, सूर्यभान घोलप, गोरक्ष ब्राम्हणे,अशोक ब्राम्हणे,शब्बीर शेख, सुकदेव पवार,विकास अनाप,शिवाजी गावडे,अनिल डिबंर,सचिन बुचुडे,रविंद्र पर्वत,सचिन पवार,सुजित पर्वत,ऋषीकेश अहिरे,दत्तात्रय प्रधान,ग्रामपंचायत सदस्य,युवक, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, ज्ञानदीप वाचनालयाचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल घोलप यांनी केले तर उपस्थित पत्रकार,ग्रामस्थ यांचे आभार वसंत घोलप व उत्तम जेजुरकर यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!