तेलंगणातुन नांदूर शिंगोटे येथे वास्तव्यास आलेल्या इसमांकडून २२ लाखाची बनावट दारू जप्त

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शासनमान्य देशी दारू दुकानातूनच बनावट दारूचा मोठा गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत उघडकीस आला आहे.
या कारवाईत तब्बल २१ लाख ८१ हजार ५३५ रुपयांचा बनावट दारू साठा जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी वेणुगोपाल सिद्धय्या चेकिल्ला (वय ४६), नरेश लिंगागौड जेल्ला (वय २९), हरिष गंगागौड बंबोतुला (वय ३०) व नरेंद्रगौड तिरुपतीगौड सुरमपल्ली (वय ३२) हे मूळचे तेलंगणा राज्यातील मात्र सध्या नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर) येथे वास्तव्यास असलेल्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

नांदूरशिंगोटे गावातील बी. एन. दिघे सीएल ३ अनु. क्र. १३१ या दुकानात बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गेल्या मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. तपासाच्या दरम्यान ११२.६८ लिटर बनावट

देशी मद्य, १९९१.५५ लिटर देशी दारू, तसेच बनावट दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी क्रेटा कार (एमएच १७ डीजे ५५३८) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा बर्मा, अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक अ. सु. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शैलेंद्र मराठे, दुय्यम निरीक्षक डी. बी. कोळपे, राहुल जाडकर, एस. एस. भगत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप यांच्यासह जवान सोनाली चंद्रगोरे, संतोष कडलग, दुर्गादास बावस्कर, अनिता गांगुर्ड, राकेश पगारे, हर्षल नांद्रे, भाऊसाहेब घुले, सचिन पोरजे, भालेराव व महेंद्र बोरसे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!