‘एआयसीटीई वाणी’ उपक्रमातून मराठी तांत्रिक साहित्याला बळ
सोनगाव शहाजी दिघे तांत्रिक शिक्षणात भारतीय भाषांचा वापर वाढावा या उद्देशाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांच्या ‘वाणी’ उपक्रम अंतर्गत राहाता तालुक्यातील लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग येथे “पर्यावरण आणि ऊर्जा शाश्वततेसाठी नवीन तंत्रज्ञान” या विषयावर मराठी चर्चासत्राचे आयोजन रासायनिक अभियांत्रिकी विभागात करण्यात आले होते.लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण पुरस्कारप्राप्त) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी रासायनिक अभियांत्रिकी विभागातील प्रा.संदिप चांगदेव दिघे संदीप यांनी लिहिलेल्या रासायनिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील निराली प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशीत केलेले पुस्तके यामध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी अँड मेन्टेनन्स, सेफ्टी इन केमिकल इंडस्ट्री,
फूड टेक्नॉलॉजी, इंट्रोडक्शन टू रिन्यूअल एनर्जी , फर्टीलायझर अँड ऍग्रो केमिकल टेक्नॉलॉजी व इमर्जिंग ट्रेंड्स इन केमिकल इंजीनियरिंग या सहा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकांचे प्रकाशन लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण पुरस्कारप्राप्त)
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ तसेच बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा कॅम्पसचे केमिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. संपतराव मांजरे यांच्या हस्ते झाले.प्रा. दिघे यांनी केमिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी सहा पुस्तके लिहिून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.
त्यांच्या योगदानामुळे डिप्लोमा विद्यार्थ्यांना व्यापक, अभ्यासक्रम-केंद्रित आणि समजण्यास सोपी अभ्यास सामग्री प्रदान करून मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. व्यापक अध्यापन अनुभव आणि सखोल विषय ज्ञानासह जटिल रासायनिक अभियांत्रिकी संकल्पना सुलभ करण्यासाठी ही पुस्तके काळजीपूर्वक लिहिली आहेत.
ही पुस्तके विशेषतः डिप्लोमा विद्यार्थ्यांना त्यांची सैद्धांतिक समज तसेच व्यावहारिक ज्ञान मजबूत करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. या पुस्तकांद्वारे, प्रा. दिघे सरांनी तांत्रिक शिक्षणात महत्त्वपूर्ण शैक्षणिक योगदान दिले आहे. तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांच्या समर्पणाची आणि वचनबद्धतेची सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रशंसा केली आहे.
त्यांच्या कामगिरीमुळे संस्थेला अभिमान वाटतो आणि अभियांत्रिकी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. ही पुस्तके लिहिण्यामागील त्यांचे मुख्य उद्दिष्ट डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सोपे आणि सुलभ करणे आणि तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात योगदान देणे आहे.
या अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी यांनी चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाबद्दल व प्रा. दिघे यांनी लिहिलेले पुस्तके याबद्दल रासायनिक अभियांत्रिकी प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एन.एम. गरड, सह-संयोजक प्रा.प्रवीण गुळवे, डॉ. विविधा लांडगे, प्रा. ए. एस. शिरसाठ, प्रा. पी.एस. काळे, प्रा. ए.जी. खर्डे, सहाय्यक कर्मचारी जे.बी. कातोरे, सागर खर्डे, वैभव पारखे हे उपस्थित होते त्यांनी अटल चर्चा सत्राच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
