कौठे मलकापूर येथे नामदार चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात

Cityline Media
0
आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण 

संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील कौठे मलकापूर येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. बोटा येथील दिवंगत शेखर शेळके संघाने विजेतेपद पटकावले,तर घुलेवाडीचा इलेव्हन संघ उपविजेता ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघांना आमदार खताळ यांच्या हस्ते नामदार चषक व आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, गणेश डोंगरे, सोमनाथ बारवे आणि श्रीपाद पवार यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.स्पर्धे दरम्यान मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमास व्यासपीठावर हरिभाऊ गीते, शिवसेनेचे मा.तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, संदीप देशमुख, भाजप अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, खांबा गावचे सरपंच रवींद्र दातीर, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, बाबाजी सागर, रणजीत ढेरंगे, बाबासाहेब गुळवे, किरण गुळवे, उल्हास गागरे, पांडू धुमाळ, शैलेश फटांगरे, गणेश डोंगरे, आनंदा सागर, सुखदेव गंभीरे, रावसाहेब गंभीरे, गोरख बागुल, डॉ. संतोष वर्पे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले की,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे  यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागाकडून साकुर पठारभागातील पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. उपसा जलसिंचन योजना तसेच बॅरेजच्या माध्यमातून लवकरच साकुर पठार परिसरातील पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्यात आपल्या विचाराचे सरकार असून पालकमंत्रीही आपलेच असल्याने विकासकामांना गती मिळत आहे.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकजूट दाखवावी,असे आवाहनही आमदार अमोल खताळ यांनी यावेळी केले.
कौठे मलकापूर परिसरातील युवकांना शाश्वत रोजगार 
कौठे मलकापूर परिसरातील युवकांना रोजगार एखादा उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल.यासाठी वरच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शक्य तेवढी विकासकामे आम्ही करतच आहोत.साकुर पठार भागाचा पाणी प्रश्नही लवकरच सुटणार आहे.”
असे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!