कोल्हार संतोष बोरुडे राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे महाशिवरात्री महोत्सव समितीतर्फे नुकतेच येथील कोल्हाळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात भव्य तालुका स्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वा निमित्त भगवती माता त्रिवाले ट्रस्टच्या वतीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.दरम्यान रांगोळी स्पर्धेकरिता मोठा गट वयोमर्यादा १५ वर्षांपुढील व लहान गट वयोमर्यादा १४ वर्षापर्यंत अशा दोन प्रकारच्या गटात विभागणी केली होती. या स्पर्धेत मोठ्या गटात एकूण ३० स्पर्धेकांनी भाग घेतला तर लहान गटात एकूण ३५ स्पर्धाकांनी भाग घेतला.
दरम्यान स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची अमृता सोमवंशी यांनी प्रतिक्रिया जाणून घेतल्या.स्पर्धेतील मोठ्या गटात प्रथम क्रमांक म्हणून निवड झालेल्या सतीश विश्वनाथ जाधव यांना कोल्हार येथील प्रसिद्ध देडगावकर सराफ यांच्यातर्फे इशानवी रोहित देडगावकर यांच्याकडून सात हजार रुपये रोख बक्षीस कोल्हार बुद्रुकचे मा.सरपंच ॲड सुरेंद्र खर्डे यांच्या हस्ते देण्यात आले. तर स्पर्धेत द्वितीय क्रमांकास नगर अर्बन बँक अध्यक्ष अनिल गरदरे यांच्यातर्फे पाच हजार रुपये रोख बक्षीस दिले, तृतीय क्रमांकास हॉटेल मेजवानी तर्फे अजय देवकर यांच्याकडून तीन हजार रुपये रोख स्वरूपात दिले तर स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकास अंभोरे पेंट्स तर्फे दोन हजार रुपये रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले.
याचबरोबर लहान गटातील रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या दिव्या नंदू गांगुर्डे स्पर्धकास जैन ऑटो पार्ट्स तर्फे परेश कुंकूलोळ यांच्याकडून पाच-हजार रुपये रोख बक्षीस भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब खर्डे यांच्या हस्ते देण्यात आले तर स्पर्धेतील द्वितीय क्रमांक शौर्य मेन्स वेअर तर्फे सोमनाथ फोपसे यांच्याकडून चार हजार रुपये रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले.
तृतीय क्रमांकास क्षत्रीय ग्रुप,कोल्हार तर्फे तीन रुपये रोख बक्षीस तर स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक कोल्हार भगवतीपूर ग्रामपंचायतच्या सदस्या प्राजक्ता मयूर कडसकर यांच्याकडून दोन हजार रुपये रोख स्वरूपात बक्षीस म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी कोल्हार बुद्रुकचे मा.सरपंच ॲड सुरेंद्र खर्डे यांनी महाशिवरात्र उत्सव समितीचे गेल्या दहा वर्षापासूनच्या सुंदर आयोजनाबद्दल तसेच दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन करत यंदाच्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभानंतर संध्याकाळी ठीक साडे आठ वाजता शिवपार्वती विवाह सोहळा रंगला त्यानंतर झालेल्या नयनरम्य आतिषबाजीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले अतिशय नेत्रदीपक झालेल्या आतिशबाजीने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता.
दरम्यान रांगोळी स्पर्धेचे परीक्षण कविता सुंबे, पुष्पा डगळे, निशिगंधा गाडेकर, गीता गुंड यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले तर आभार राहुल मोरे यांनी मानले.याप्रसंगी कोल्हार बुद्रुकचे मा.सरपंच ॲड सुरेंद्र खर्डे ,भगवती
माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब खर्डे कोल्हार भगवतीपुरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, कोल्हार बुचे उपसरपंच गोरख खर्डे,वसंत मोरे देवालय ट्रस्टचे विश्वस्त विजय निबे,वसंत खर्डे, कोल्हार भगवतीपुर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित मोरे, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, भगवतीपूरचे पोलीस पाटील सुखलाल खर्डे, महेंद्र खर्डे,मयूर कडसकर,पत्रकार गणेश सोमवंशी, अरुण बोरुडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाशिवरात्र महोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
