आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावचे ग्रामदैवत महांकाळेश्वरांचा यात्रा उत्सव सोमवार दि. १६ फेब्रुवारी ते मंगळवार दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी असल्याची माहीती यात्रा उस्तव कमिटीने दिली.
आश्वी खुर्द परिसरात नवसाला पावणारे महांकालेश्वर ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.श्री.क्षेत्र काशी या ठिकाणाहून महाकाळेश्वराची पिंड आणुन ग्रामस्थांनी मंदीराचा जिर्णाद्वार केला आहे. सोमवार दि १६ फेब्रुवारी ला सकाळी महांकाळेश्वराचा विधीवत महाभिषेक होणार आहे.
दुपारी १ वा भव्य बैलगाडा शर्यत सांयकाळी ५ वा रथ मिरवणूक आतषबाजी, त्यांनतर रात्री ८ वा. जागरणगोधळ. तर रात्री ९ वा आशिष मुथ्या मुंबई प्रस्तुत अर्मुतवर्षी ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित केला आहे तर मंगळवार दि.१७ सकाळी अलकाताई माने राहुरी यांच्या हाजऱ्या तर सांयकाळी ४ वा. जंगी कुसत्यांचा हागामा व यात्रा उत्सव होणार असून या यात्रेला परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन यात्रा कमेटी व ग्रामस्थ आश्वी खुर्द यांनी केले आहे
