नाशिक दिनकर गायकवाड बंद घराचे कुलूप तोडून चार तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेल्याची घटना अंबड गावात भरदिवसा घडली.
घडलेल्या घटनेबाबत प्रभावती शरद जाधव (वय ४८, रा. अंबड गाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. २९ जानेवारी रोजी दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान त्यांच्याघराच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.
त्याने घरातून २० हजार रुपये रोख, ९ ग्रॅम वजनाचे ३० हजार १०० रुपये किमतीचे सोन्याचे लटकन, १०.७८० ग्रॅम वजनाचे ३० हजार ४०० रुपये किमतीचे सोन्याचे पान व सोन्याचा शिक्का, ५.३० ग्रॅम वजनाचा १४ हजार रुपये किमतीचा सोन्याचा वेढा, ७.५०० ग्रॅम वजनाचा २२
हजार ६२० रुपये किमतीचा सोन्याचा वेढा, ४.१९० ग्रॅम वजनाची १३ हजार ८०० रुपये किमतीची सोन्याची ठुशी असा एकूण १ लाख ३० हजार ९२० रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार साळवे करीत आहेत.
