देवगड देवस्थानसाठी निधी कमी पडू देणार नाही

Cityline Media
0
आमदार अमोल खताळ यांची सपत्नीक महाआरती

आमदार अमोल खताळ यांनी केले रथाचे सारथ्य;ग्रामस्थांमध्ये चैतन्य 

संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील श्री.क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे.त्यामुळे येत्या काळात या देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. देवस्थानाच्या विकासासाठी भविष्यात कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही,असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड येथील खंडोबा महाराज यात्रोत्सवनिमित्त आमदार खताळ व त्यांच्या पत्नी सौ.नीलम खताळ यांच्या हस्ते खंडोबा मल्हार मार्तंडाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग व अश्वारूढ संघटना,हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अश्व व पशुपक्षी प्रदर्शनाचे लोकार्पण आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खंडोबा देवगड देवस्थानपासून अश्व प्रदर्शनापर्यंत निघालेल्या मिरवणुकीतील रथाचे आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी सौ.नीलम खताळ यांनी सारथ्य केले. 

प्रसंगी आमदार खताळ म्हणाले की,देवगड येथे यात्रोत्सवानिमित्त येणाऱ्या खंडोबा भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये,यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून पुलाचाही प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.या कामांसाठी निधी उपलब्ध करून देताना कुठेही हात आखडता घेतलेला नाही.
यात्रोत्सव निमित्त दरवर्षी‌ प्रमाणे यंदाही अश्व प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या अश्व प्रदर्शनात विविध जातीचे अश्व सहभागी झाले आहेत. देवस्थानाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू तसेच आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. या परिसरातील बहुतांश विकासकामे अंतिम टप्प्यात आली आहेत.मधल्या काळात नागरिकांनी मांडलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुद्धा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मार्गी लावला जाणार आहे या खंडोबा देवस्थानच्या माध्यमातून पर्यटनवाढ कशी? होईल यासाठीही विशेष प्रयत्न केल जातील,असेही आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपचे मा. तालुकाध्यक्ष.काशिनाथ पावसे, देवगड अश्व सेवा संस्थेचे अध्यक्ष उत्तम जाधव,हिवरगाव पावसा गावचे सरपंच  सुभाष गडाख, उपसरपंच सौ.सुजाता दवंगे यांच्यासह भाऊसाहेब जाधव, केशव दवंगे, गणेश दवंगे, सोमनाथ भालेराव,सुधीर शेळके,मकरंद मुळे, मथाजी पावसे, नारायण पावसे, बाबुराव पावसे, कैलास दिवटे, गणपत पावसे गोरख पावसे, गणेश पावसे, नवनाथ पावसे,सोमनाथ दवंगे, मच्छिंद्र गडाख, मंडू गडाख, चंद्रशेखर गडाख, कैलास गडाख, सुरेश पावसे, रावसाहेब जाधव, प्रकाश पावसे, दीपक भालेराव, लहानु भालेराव, बाळू भालेराव, विनोद सूर्यवंशी, श्याम राहाणे, अण्णा साहेब काळे, सुधाकर शिंदे,विशाल वर्पे,सचिन शिंदे , देविदास कदम, नंदकिशोर शिंदे,यांच्यासह इतर मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार अमोल खताळ यांनी  सपत्नीक केले रथाचे सारथ्य;ग्रामस्थ उत्साहात 

संगमनेर तालुक्यातील प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र देवगड येथे खंडोबा महाराजांची महाआरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. महाआरतीनंतर यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अश्व प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाकडे जात असताना ग्रामस्थांनी आमदार खताळ यांना रथात बसण्याची विनंती केली. ग्रामस्थांची विनंती मान्य करत आमदार अमोल खताळ यांनी रथात बसून प्रत्यक्ष त्या रथाचे सारथ्य केले. यावेळी खंडोबा महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!