पंचवटीत वेगवेगळ्या ठिकाणी दोन दुचाकीची चोरी

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड पंचवटी परिसरात वेगवेगळ्या दोन विकाणांहून दोन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाहन चोरीचा पहिला प्रकार आडगाव शिवारात घडला. फिर्यादी अभिषेक युवराज पवार (रा. नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय यांनी दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास आडगाव शिवारातील अजिंठा हॉटेलच्या पाठीमागे एमएच ४१ एडब्ल्यू ९८५८ या क्रमांकाची २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल उभी केली होती. ही मोटारसायकल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनचोरीचा दुसरा प्रकार सर्व्हिस रोड येथे घडला. फिर्यादी संगीता विनायक बोरसे (रा. वृंदावननगर, ता. जि. नाशिक) यांनी जत्रा हॉटेलजवळील स्टेट बँकेच्या समोर सर्व्हिस रोडवर एमएच ४१ पी ३०७३ या क्रमांकाची १५ हजार रुपये किमतीची हिरोहोंडा मोपेड पार्क केली होती. ही मोपेड अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेली.या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास अनुक्रमे पोलीस हवालदार अहिरे व पाटील करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!