म्हैसगांव कमलेश विधाटे ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मानधनवाढीचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून,शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी संघटनेने मागणी करत राहुरी श्रीरामपुर,राहता,पाथर्डी अकोला,नेवासा,तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक व अहिल्यानगरचे जिल्हा अध्यक्ष अनिल गंगावणे, उपाध्यक्ष ,यांच्या संघटनेचे पदाधिकारी व सदस्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी २४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे आयोजित धरणे आंदोलनात सहभागी घेण्यासाठी नुकतेच रवाना झाले आहेत.
३ ऑक्टोबर २०२५ च्या निर्णयानुसार अधिसूचना अंमलात आली आहे परंतु अद्याप ती लागू झाला नाही त्यामुळे मानधन चालु झालेच नाही तसेच चार पाच महिने टक्केवारी मानधन दिले पण जात नाही तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले आहे.
ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मानधनवाढीचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून,शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी संघटनेची मागणी सातत्याने होत आहे या आंदोलनात अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष,सर्व तालुका संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडणार असून,आपल्या न्याय हक्कांसाठी ग्रामरोजगार सहाय्यक एकवटले असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.राहुरी तालुक्यातून मुंबईकडे प्रयाण करण्यापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे पुन्हा एकदा मानधनवाढी बाबत ठोस निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
अधिसूचना फक्त नाव पुरतीच आहे असे बोलले जात आहे तो जो पर्यंत रोजगार सहायकासाठी अंमलात येऊन मानधन चालू होत नाही तो पर्यंत आंदोलन चालू राहील असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
