म्हैसगांव कमलेश विधाटे राहुरी तालुक्यातील म्हैसगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रसंगी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार दीप प्रज्वलन करून आरती करण्यात आली.यावेळी श्री केदारेश्वर मंदिर परिसरातून ट्रॅक्टरच्या ट्रेलरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती.एका युवकाने महाराजांचे रूप धारण केले होते.
मंदिरापासून ग्रामस्थ, महिला व युवकांनी सहभाग घेऊन पायी भव्य मिरवणूक काढली.डीजेच्या गजरात “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. ही मिरवणूक सायंकाळी सुरू होऊन गावात दाखल झाली.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुजाता अरुण पवार, उपसरपंच शिवाजी बर्डे,सदस्य भिमा दुधाट ,डॉ.शशिकांत गागरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गागरे,माजी सरपंच महेश गागरे, तंटामुक्ती अध्यक्ष गहिनीनाथ हुलुळे,सोसायटीचे अध्यक्ष
नानासाहेब गागरे,तसेच सचिन गागरे,सोमनाथ जाधव, दत्तू गागरे,पत्रकार कमलेश विधाटे, पत्रकार सुभाष आग्रे, शशिकांत विधाटे, प्रकाश यादव,चांगदेव चोपडे, बाबासाहेब गागरे,सुखदेव दुधाट,अशोक नेहे, पुंजा मुसळे,गणपत मुसळे, पांडुरंग गागरे,भाऊसाहेब पारधे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन अनिल पवार यांनी केले .कार्यक्रम दरम्यान मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या शौर्य, स्वराज्य स्थापनेचा आदर्श आणि समाजकल्याणाच्या विचारांचे स्मरण केले.गावकऱ्यांनी जोशपूर्ण घोषणाबाजी करत वातावरण देशभक्तीमय केले.ह .भ .प दादा रंजाळे त्याच्या भव्य दिव्य किर्तनाचा कार्यक्रम झाला.
अंतिमतः स्नेहभोजन देऊन जेवण करण्यात आले हा शिवजयंतीचा कार्यक्रम शिवस्वराज्य मित्र मंडळ म्हैसगांव यांनी केला आहे या वेळे मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.
