मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळांच्या पाठपुराव्याला यश,खळीच्या खंडोबा देवस्थानला 'क' वर्ग दर्जा प्राप्त

Cityline Media
0


संगमनेर किशोर वाघमारे तालुक्यातील पूर्व भागाच्या शिर्डी विधानसभा मतदार संघातील खळी येथील परिसराचे कुलदैवत श्री.खंडोबा देवस्थान ट्रस्ट या देवस्थानास महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री व संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्या शिफारशीने खळी येथील श्री.खंडोबा देवस्थान ट्रस्टला नुकताच महाराष्ट्र शासनाचा 'क' वर्ग दर्जा प्राप्त झाला असून गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ह्या देवस्थानचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला असून क वर्ग दर्जा मिळाल्याने सदर देवस्थानास विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ६५ एकर क्षेत्र असल्याने या क्षेत्रासह मंदिराचा सभा मंडप डोंगरावर मंदिरात जाण्यासाठी रस्ता भक्तांना राहण्यासाठी भक्तनिवास 

रुग्णवाहिका स्वच्छ पाणी पिण्याचे वॉल कंपाऊंड सांस्कृतिक भवन आदी महत्त्वाच्या गोष्टीचा विकास करण्यासाठी खळी येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यंत्रणेमार्फत व वर्ग दर्जा मिळण्यासाठी श्री खंडोबा 

देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सचिव विश्वस्तांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता त्याकरिता संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी शिफारस करून खळी ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री 

नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांची कृतज्ञता व्यक्त केली असून खळी परिसरात या देवस्थानच्या माध्यमातून खळी गावचा चेहरा मोहरा बदलणार असून गावचे अनेक विकासात्मक कामे या देवस्थानच्या माध्यमातून होणार असल्याने येथील ग्रामस्थांसह भक्त मंडळाने मंत्री विखे पाटील व आमदार अमोल खताळ साहेब यांचे आभार व्यक्त केले आहे.देवस्थान अध्यक्ष किशोर वाघमारे व प्रा.रमेश सानप सचिव यांनी प्रस्ताव देण्यासाठी व क वर्ग मिळण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!