पाय घसरून विहिरीत पडल्याने युवक मृत्यू

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड विहिरीत पाय घसरून
पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. निकेश मिथिलेश सिंग (वय ३२, रा. दातीर मळा, अंबड, नाशिक) हा दि. १९ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आबा पिंगळे यांच्या विहिरीत पाय घसरून पडला होता. त्यात त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही बाब लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याचे मामा निरजकुमार सिंग यांनी पुढील उपचारासाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टोपले करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!