ट्रॅक्टर चलित सेन्सर आधारित पिकांच्या गरजेनुसार देणार खतांची मात्रा.
संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील
राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद बबनराव पावसे यांचे सुपुत्र डॉ.प्रणव प्रमोद पावसे यांनी डॉ.अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी येथील पीएच.डी. संशोधनासाठी नाबार्ड कडून उत्कृष्ट डॉक्टरेट प्रबंध-२०२३ या श्रेणीत राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता,खतांची आवश्यकता आणि पिकांच्या गरजेनुसार खतांची मात्रा देणारे ट्रॅक्टर चलित सेन्सर आधारित यंत्र शेती व मानवी आरोग्यसाठी वरदान ठरणारे आहे.जमीन आणि पाण्याचे प्रदूषण कमी करणे,मजुरांची कमतरता दूर करून शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणारे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे यंत्र विकसित केले आहे.
या यंत्राच्या सहाय्याने तीस टक्के खतांची बचत होते.या संशोधनाला नाबार्डचा राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाला आहे.एक लाख रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन डॉ.पावसे यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या पीएच.डी.संशोधनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी संलग्नडॉ.अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सचिन मधुकर नलावडे यांनी मार्गदर्शन केले.
डॉ.प्रणव पावसे यांच्या यशाबद्दल मा. मंत्री बाळासाहेब थोरात,मा. आ. डॉ.सुधीर तांबे,खासदार भाऊसाहेब वाकचौरे,आ.सत्यजित तांबे,डॉ.जयश्री थोरात,राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर,पांडुरंग घुले,ॲड.माधवराव कानवडे,मा.नगराध्यक्षा दुर्गा तांबे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव,नवी मुंबईचे मा. महापौर सुधाकर सोनवणे, संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मैथिली तांबे,महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी कुलगुरू डॉ.विलास खर्चे यांच्या सह राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
गरजेपेक्षा जास्त दिले जाणारे खते औषधे यामुळे पिके,शेती आणि मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.अतिरेकी खतांच्या औषधांच्या वापरामुळे पाणी खराब झाले आहे.शेती नापीक होत आहे.कॅन्सर सारखे अनेक गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे.अशा परिस्थितीत डॉक्टर प्रणव पावसे यांनी शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण व शेतकऱ्यांसाठी केलेले संशोधन उपयुक्त ठरणारे आहे.
या नाविन्यपूर्ण संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत उत्पादन,संसाधन कार्यक्षमता आणि जोखीम कमी करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे.डॉ.पावसे यांनी आजपर्यंत १ पेटंट,१ कॉपीराइट,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील २५ संशोधन लेख तसेच २ शैक्षणिक पुस्तके प्रकाशित केली असून, त्यांचे संशोधन कृषीअभियांत्रिकी व हवामान-स्मार्ट शेती क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणारे आहे.
डॉक्टर प्रणव पावसे यांच्या कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी नाबार्ड कडून उत्कृष्ट डॉक्टरेट प्रबंध-२०२३ या श्रेणीत राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाबद्दल हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ पावसे,
शिवसेना तालुका उपप्रमुख भीमाशंकर पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे, सोसायटीचे संचालक अशोक भालेराव,सरपंच सेवा संघाचे नेते बाबासाहेब पावसे,देवगड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा उगले,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक आर.पी.राहणे,
ग्रामसेवक हरिष गडाख,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,शिवसेना मागासवर्गीय सेलचे जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव
प्रा.बाबुराव पावसे,केशव दवंगे,गायक हरिश्चंद्र भालेराव,
देवगड देवस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,अनिल गडाख,संतोष पावसे,पोलीस पाटील मथाजी पावसे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष डॉ.विजय पावसे,जय मल्हार दूध संस्थेचे अध्यक्ष डॉ.संदीप पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव, सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,ज्ञानेश्वर पावसे,आप्पासाहेब गडाख, रामनाथ गडाख,मल्हारी पावसे डॉ.रमेश पावसे यांच्या सह हिवरगाव पावसा गावातील सर्व संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
