राज्यात एकलव्य जयंतीची जय्यत तयारी-ज्ञानेश्वर अहिरे

Cityline Media
0
लोणी शंकर सोनवणे राज्यात गुरुवर्य एकलव्य यांच्या जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली असून महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण राज्यात एकाच वेळी गुरुवर्य एकलव्य यांची जयंती मोठ्या थाटात व प्रसन्न वातावरणात साजरी केली जाणार आहे असल्याची माहिती एकलव्य आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिली.
श्री.अहिरे म्हणाले की आदिवासी भिल्ल समाजाचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान असलेले गुरुवर्य एकलव्य यांच्या जयंतीची संपूर्ण राज्यात धूम सुरू असून अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात जयंतीची तयारी पूर्ण झाली आहे.
राज्यातील प्रत्येक गावात शिवरात्रीच्या दिवशी एकाचवेळी गुरुवर्य एकलव्य यांच्या प्रतिमेची पूजा आदिवासी मान्यवरांच्या तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करून गावातून ढोल ताशांच्या गजरात ‌डीजे व पारंपरिक वाद्य तसेच आदिवासी नृत्य अशा वैविध्यपूर्ण वातावरणात भव्य मिरवणूक काढली जाईल.

मिरवणूकी नंतर प्रत्येक गावात उपवासाचे पदार्थ तसेच फळांचे वाटप केले जाईल.व त्यानंतर सभेत रूपांतर होईल प्रसंगी राज्यातील सर्व जिल्ह्याध्यक्ष व त्या जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत‌ हा दिमाखदार सोहळा पार पडेल.

त्यासाठी संपूर्ण राज्यातील आदिवासी सज्ज झाले असून आपल्या दैवताची जयंती असल्याने राज्यातील आदिवासींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आदिवासी महिला पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत तसेच राज्यात अनेक ठिकाणी आदिवासीं कडून वृक्ष रोपण करून निसर्गाचा समतोल राखला जाईल तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्या पेन वाटप करून शिक्षणाचे महत्व सांगितले जाईल.

राज्यातील आदिवासींच्या घरावर गुरुवर्य एकलव्य यांच्या नावाचा झेंडा लावला जाईल.असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातील व अतिशय शांततेच्या मार्गाने गुरुवर्य एकलव्य यांची जयंती साजरी केली जाईल त्यासाठी आदिवासी नेते सक्रिय झाले असून संपूर्ण राज्यात आपापल्या परिसरामध्ये जयंतीला भेटीगाठी देतील व सहभागी होतील.

तरी सर्व आदिवासींना आवाहन आहे की राज्यात आपल्या दैवताची जयंती असल्याने संपूर्ण राज्याने आपला आदर्श घ्यावा अशा शांततेच्या मार्गाने व प्रसन्न वातावरणात जयंती वेळेत साजरी करावी असे आवाहन ज्ञानेश्वर अहिरे यांनी भिल्ल समाजाला केले आहे. आदिवासी नेते शिवाजी गांगुर्डे, कैलास माळी, दिलीप बर्डे, संजय बर्डे, नारायण माळी, राधाकृष्ण बर्डे, राजू निकम, मधुकर निकम, संदीप बर्डे, शिवाजी जाधव,भास्कर बर्डे, संजय गांगुर्डे, रघुनाथ अहिरे, शिवाजी मोरे, राजेंद्र पिंपळे, सुखदेव गायकवाड, हर्षद बर्डे, अनिल रोकडे, सुदाम मोरे आदी पदाधिकारी जयंतीला भेटी देऊन मार्गदर्शन करणार आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!