धर्मांतर कर अन्यथा नग्न फोटो सोशल मीडियावर; धमकी देत मागितली १५ लाखांची खंडणी

Cityline Media
0
नाशिक  दिनकर गायकवाड नग्फोन फोटो प्रसारमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन धर्मांतर केले नाही,तर १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                छाया रेखांकन-प्रकाश कदम 
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शुभम् अर्जुन रिकामे (रा. गजानन चौक, पंचवटी) यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. रिकामे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सन २०२२ ते दि. ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपी अब्दुल जलालउद्दीन शेख (रा. कालिकानगर, मुंबई

नाका, नाशिक) व गुरू सलमा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये फिर्यादीसोबत फिर्यादीच्या घरी व कालिकानगर येथे काही न्यूड फोटो काढले होते.

हे फोटो प्रसारमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी फिर्यादीला दिली, तसेच फिर्यादीकडे "एक तर धर्मांतर कर, नाही तर १५ लाख रुपयांची खंडणी दे," अशी मागणी दोन्ही आरोपींनी संगनमताने केली. या दोन्ही मागण्या मान्य केल्या नाहीत, तर फिर्यादीसह त्याच्या घरच्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेमाणे करीत आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!