सामाजिक संदेश देत ऋषिकेश आणि साक्षी यांचा शुभविवाह उत्साहात
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील खळी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब चौधरी यांच्या कन्येच्या च्या विवाहानिमित्त चौधरी कुटुंबाने एक अनोखा व सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबविला.विवाह सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवर, पाहुणे व नातेवाईकांना कलमी आंब्याची रोपे भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी बाळासाहेब डोळे यांचे व पत्रकार सोमनाथ डोळे यांचा भाचे ऋषिकेश यांचा विवाह राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव दाढकर यांची कन्या साक्षी यांच्याशी नुकताच उत्साहात झाला.या विवाह सोहळ्यात विविध पक्षांचे पदाधिकारी,नेते,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचा सन्मान पारंपरिक शाल-श्रीफळाऐवजी कलमी आंबा रोपे देऊन करण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
विवाह प्रसंगी ह.भ.प. दत्तगिरी महाराज,नेवासा तालुक्यातील बालब्रह्मचारी व हनुमान भक्त बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, तसेच ह.भ.प. कुहिले महाराज यांचे आशीर्वाद लाभले.तसेच महंत माणिक गिरी महाराज व बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांच्या शुभाशिर्वादाने विवाह सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला.
लग्न समारंभासाठी विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने वेळेचे नियोजन महत्त्वाचे होते. त्यामुळे सर्वांच्या सूचनेनुसार फक्त महाराज व महंत यांचेच नाव घेऊन आशीर्वाद कार्यक्रम पार पाडण्यात आला. या निर्णयामुळे विवाह सोहळा वेळेत आणि शिस्तबद्धरीत्या पार पडला.
याबद्दल उपस्थित पाहुणे व नातेवाईकांनी आयोजकांचे विशेष आभार मानले.या विवाह सोहळ्यास पद्मश्री कारखान्याचे मा.अध्यक्ष कैलास तांबे, राहुरी तालुक्याच्या मा. सभापती मंदा डुकरे, प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे संचालक पोपट वाणी,ॲड.आप्पासाहेब दिघे, संगमनेर दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जावेद सय्यद व प्रल्हाद पाठक, सामाजिक कार्यकर्ते सुरेश नागरे ,शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्याम गोसावी, रमेश पन्हाळे, नारायण कहार, प्रा. बाबासाहेब वाणी, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू सिनारे,
प्राध्यापक सतीश वाणी, प्राध्यापक शुभम चौधरी, माधव हारदे, मुख्याध्यापक हनुमंता गिरी, योगेश चोरमुंगे,राजेंद्र चोरमुंगे, किरण अंत्रे ,डॉ.किरण आहेर, ॲड विवेक लगड, निवेदिका गायत्री मस्के, उद्योगपती लक्ष्मणराव डोळे, प्राध्यापक रामचंद्र डोळे, भाऊसाहेब जपे,गोकुळ वाणी, मधुकर वाणी,
डॉ. पोपटराव वाणी, विलास वाणी, काशिनाथ चव्हाण, शिवाजी वाकचौरे, रवींद्र कांबळे, प्रकाश सोनवणे, अनिल पाटोळे, डॉ.अनिल लोखंडे,पत्रकार, राजेश गायकवाड, रवींद्र बालोटे,शिक्षक संघटनांचे साहेबराव अनाप, प्राध्यापक विलास वाणी चांगदेव पलघडमल, पोपट आनंद पाटील, भिकाजी वाणी,, ग्रामविकास अधिकारी अनिल वाणी,,गोरख वाणी, अनुराधा वाणी,सरपंच अशोक वाणी,तसेच जनसेवा युवा झरेकाठी मंचचे सर्व सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
