संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील कोंची येथील स्व.दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानाच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी सेवाभावी उपक्रमांतर्गत सर्व पंथीय १७० व्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा नाशिक मधील मुक्तीधाम रोड चर्च हॉल, सेंट फिलिप चर्च, टिळक पथ या ठिकाणी दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे.
यावेळी मेळाव्यास रेव्ह.रुपेश निकाळजे, रेव्ह.प्रशांत बनसोडे, सचिन आरसूड,सायमन भंडारे,रवींद्र मुंतोडे,सुनील साळवे,डॉ. विनीत वानखेडे आणि माया त्रिभुवन हे मान्यवर मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचे व्यवस्थापक विश्वास बनसोडे व डॅनियल पगारे आहेत.हा मेळावा अविवाहीत,विधवा, विधुर,घटस्फोटीत व अपंग यांच्यासाठी असून आलेल्या या संधीचा इच्छुकांनी फायदा घ्यावा असे अवाहन
संयोजक श्रीधर भोसले यांनी केले असून इच्छुकांनी
७०८३९२२०५२) विश्वास ९६७३९९६३३४, डॅनीएल ९०७५८३३८०० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
