नाशिक प्नतिनिधी वैवाहिक आयुष्य सुखी आणि निरोगी जगण्यासाठी लग्नापूर्वी तरुणांच्या विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करणे अतिशय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन नाशिकचे प्रसिद्ध डॉ. विनीत वानखेडे यांनी केले.
संगमनेरच्या स्व.दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानाने नुकतेच नाशिकरोडच्या सेंट फिलिप चर्च मध्ये आयोजित केलेल्या १७०व्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी डॉ.वानखेडे बोलत होते.वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजाचे संघटन होत असल्याचे नमूद केले.
भविष्यात असे कार्यक्रम सातत्याने होत रहावेत असेही आवाहन डॉ वानखेडे यांनी प्रसंगी केले.मार्गदर्शन करताना रेव्ह. प्रशांत बनसोडे म्हणाले कि ख्रिस्ती कुटुंबातल्या प्रीतीची वाढ ही एकमेकांवरील विश्वासाने होत असते. जीवनसाथी निवडताना मुलामुलींनी रुपापेक्षा शिक्षणाला व सस्काराला अधिक महत्व द्यावे असे अवाहन सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे यांनी यावेळी केले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मायाताई त्रिभुवन यांनी विवाह सस्काराचे महत्व व्यापक स्वरूपात विषद करून एकत्र कुटूंब पद्धतीने समृद्ध जीवन जगावे असाही सल्ला यावेळी दिला.यावेळी नाशिक संभाजीनगर, अकोला,मुंबई, नगर, पुणे,इत्यादी जिल्यांतून आलेल्यांची उपस्थिती १७५ हुन अधिक दिसून आली.
सामाजिक कार्यकर्ते डॅनिएल पगारे यांनी प्रास्ताविक केले तर सेंट फिलिप चर्चचे सचिव सचिन आरसूड यांनी उपस्थितांचे आभार मानले. सम्पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले.
