जिने जन्म दिला त्या आईच्या घरात घुसखोरी करून आईला अक्षरशःलेकीने आणले रस्त्यावर

Cityline Media
0
 श्रीरामपूर प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाची घरघुसखोर आणि पोलिसांकडून बोळवण

‌श्रीरामपूर ज्ञानेश्वर साबळे जिथे देव नसतो तिथे आई असते म्हणूनच साने गुरुजी म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी पण पोटचा मुलगा संभाळ करत नाही म्हणून मोठ्या लेकीने कुणाच्या तरी साथीने नियोजित योजना आखून मानवतेला काळिमा फासणारी घटना श्रीरामपूर येथे नुकतीच घडली.
येथील वार्ड क्र.४ बाजार तळ सानप ऑटोमोबाईल च्या पाठीमागे राहणाऱ्या चंद्रभागा रामभाऊ सोनवणे (वय ७६)यांना त्यांची मोठी मुलगी नंदा नानासाहेब चव्हाण (वय ५०) या आपल्या सासरी झालेल्या किरकोळ भांडणाचे कारण दाखवून चंद्रभागा सोनवणे यांच्या घरात घुसखोरी केली.काही दिवसांनी जेव्हा घरमालक चंद्रभागा सोनवणे यांनी मुलगी नंदा हिला तिच्या घरी जाण्याचा आग्रह केला तर त्या लेकीनेच आईलाच आईच्या घरातून बाहेर काढून अक्षरशःरस्तोरस्ती भटकण्यास भाग पाडले.ही जन्मदाती माता ब्लड प्रेशर व इतर आजाराने ग्रस्त असुन डोक्यावर कुठलाही निवारा नाही इतरत्र भटकत असतानाचे सोशल मीडियावर दिसत आहे.

जन्मदाती माता रस्त्यावर आणि इकडे मात्र नंदा रामदास चव्हाण त्यांच्याच आईच्या घरात घुसखोरी करून सुखात जगत आहे आता त्याच घरात व्याजाचा धंदा सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा चालू आहे.
घडलेल्या घटना आई चंद्रभागा रामभाऊ सोनवणे दुसरी मुलगी सुनिता रामभाऊ सोनवणे सोनवणे यांनी येथील प्रातांअधिकारी  यांच्याकडे आई वडील व ज्येष्ठ नागरिकाचा उदनिर्वाह कल्याण अधिनियम २००७ अंतर्गत अर्ज न्याय मिळावा म्हणून दाखल केला.

प्रांताधिकार्‍यांनी घेतलेल्या या प प्रकरणाच्या कोणत्याच तारखासाठी नंदा चव्हाण उपस्थित नव्हत्या सतत गैरहजर हजर राहिल्याने प्रांताधिकारी तथा अप्रत्यक्ष पदस्थ अधिकारी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण श्रीरामपूर यांनी याबाबत आदेश देऊन मालक चंद्रभागा रामभाऊ सोनवणे यांना नंदा नानासाहेब चव्हाण यांनी तात्काळ घर खाली करून देऊन इतरत्र राहण्यास जावे असे आदेश दिले.

प्रांताधिकार्‍यांनी आदेशात पुढे म्हटले आहे की नंदा नानासाहेब चव्हाण यांनी आई चंद्रभागा रामभाऊ सोनवणे कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्यास अर्जदार यांनी पोलीस निरीक्षक श्रीरामपूर यांना सुचित करावे त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीरामपूर पोलीस ठाणे यांनी सामनेवाला याचे विरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी असे आदेश दिले असताना नंदा नानासाहेब चव्हाण या घर खाली करण्याचा फक्त बाहना आणि चालढकल करताना दिसतात उलट गुंड जमवून धाकदपटशा निर्माण करताना दिसतात याबाबत फिर्यादी चंद्रभागा रामभाऊ सोनवणे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी दखलपात्र गुन्हा न नोंदवता गुन्हा रजिस्टर नं.१७९५/२०२४ भारतीय न्याय संहिता ३५२,३५१ (२) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.यात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद आहे,पुढील तपास पोना शिंदे हे करित आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!