नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिकेत गेली चार वर्षे प्रशासकीय राजवट होती.त्यामुळे लोकांच्या समस्या सुटल्याच नाही.महापौर हिमगौरी आडके यांनी सूत्रं स्विकारल्यानंतर त्यांच्याकडे यासंदर्भातील तक्रारी आणि सूचनांचा ओघ वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी कुसुमाग्रज जयंतीपासून 'नमस्कार नाशिककर' हा पत्र संवाद कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर २४ तास हेल्पलाईन देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. महापौर आडके यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने अनेक नागरी समस्या सुटल्या नाही. खोदलेले रस्ते,
विस्कळीत पाणी पुरवठा या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेतच.परंतु आणखी अनेक समस्या आहेत. महापौरपदी निवडून आल्यानंतर प्रत्यक्ष भेटून,निवेदने देऊन फोन करून किंवा सोशल मिडीयावरून सातत्याने नागरिक सूचना आणि तक्रारी करीत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला भेटणे शक्य नसल्याने महापौरांनी पत्र संवादाचा उपक्रम घेतला आहेत.
प्रशासन प्रत्येक समस्येसाठी कटीबध्द आहे.आमचे नगरसेवक देखील आपल्या सेवेत आहेतच. तसेच एनएमसी कनेक्ट या ॲप किंया अन्य प्रकारे तक्रारी केल्यास त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत एकत्रीत दखल घेऊन तशी माहिती देण्यात येईल, असेही महापौर हिमगौरी आहेर आडके म्हणाल्या.खोदलेले रस्ते आणि विस्कळीत पाणी पुरवठा यासंदर्भात लक्षवेधी दाखल करून घेण्यात आली आहे. पुढील महिन्यात त्यावर विशेष महासभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती हिमगौरी आडके यांनी दिली.
